Amey khopkar biography definition


“थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर…”, मनसे नेत्याची पोस्ट चर्चेत; मराठी सिनेमाकर्त्यांना म्हणाले, “लवकरच तारीख…”

देशभरात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक सिंगल स्क्रीन थिएटरच्या संख्येत गेल्या काही वर्षात लक्षणीय घट झालेली आहे. ही सिंगल स्क्रीन चित्रपटगृहं हळुहळू बंद होऊ लागली आहेत. याबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मराठी सिनेमाकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात…

मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पती आहे बँकर; लग्नाचे फोटो पाहिलेत का?
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
यशाच्या शिखरावर असताना काम करणं बंद केलं कारण….; अभिनेत्री किशोरी गोडबोले काय म्हणाली?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!

“गेल्या काही वर्षात देशातील सिंगल स्क्रीन थिएटरची संख्या २०,००० ते ५५०० (मरणासन्न) इतकी घटलीये. पुण्यातील ३० पैकी ९ बंद. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील ४०० पैकी ५० थिएटर कायमची बंद पडलील, तर ५० बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उरलेल्या थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं (आतातरी). मी लवकरच तारीख जाहीर करेन.” अशी एक्स पोस्ट अमेय खोपकर यांनी शेअर केलेली आहे.

गेल्या काही वर्षात देशातील सिंगल स्क्रीन थिएटर ची संख्या 20,000 ते 5500 (मरणासन्न) इतकी घटलीये. पुण्यातील 30 पैकी 9 बंद. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 400 पैकी 50 थिएटर कायमची बंद पडलीत, तर 50 बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उरलेल्या थियेटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर मराठी…

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 26, 2025

दरम्यान, मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांत कलाविश्वातून अनेक मान्यवरांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळेच आता यावर एकत्र येऊन चर्चा करुन मार्ग काढण्याचं आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी महेश मांजरेकर, अभिजीत पानसे, संजय जाधव, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव यांनाही टॅग केलं आहे.